बुधवार, २९ जुलै, २०२०

केळीसाठी नत्र (Nitrogen)


      

"तंत्रज्ञान आधारित शेतीचा वायदा ,
             कमी खर्चात जास्त फायदा ...... "

 नत्र हा केळीच्या वाढीसाठी मुख्य प्रवर्तक आहे . लागवडीच्या पहिल्या ६ महिन्यांत जर जास्त निरोगी आणि मोठ्या आकाराची पाने असतील तर घडांचा आकारही मोठा असेल.  पानांच्या संख्ये वर तसेच पानाच्या देठाच्या लांबीवर देखील नत्राचा प्रभाव असतो . 

नत्राची कमतरता कशी ओळखावी ?

Severe nitrogen deficiency symptom on banana petioles
(नायट्रोजन कमतरतेची अती तीव्र लक्षणे)
  • नवीन पाने येण्यास  विलंब होतो तसेच दोन पानांमधील अंतर देखील कमी होते . 
  • पाने फिकट पिवळ्या रंगाची होतात . 
  • पानाचा देठ Midrib  व Petiol  फिकट गुलाबी रंगाची दिसतात . 


पेटीओल्स जांभळट गुलाबी रंगांची होतात व त्यांच्यातील अंतर
देखील कमी होते



                                                     
















          नत्राचा अधिक वापर झाल्यास  फळ देण्यास  उशीर होऊ शकतो. 
          बऱ्याच वेळेस नायट्रोजन ची कमतरता  आणि गंधक याची कमतरता यांची लक्षणे पानावर सारखी दिसतात . परंतु नायट्रोजन कमतरतेची लक्षणे जुन्या पानावर दिसतात तर गंधकाच्या  कमतरतेची लक्षणे नवीन पानावर दिसतात . 

नत्राची कमतरता खालील कारणांनी अधिक वाढू शकते . 

१) जमिनीमध्ये  सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे . 
२) जमिनीचा पी एच कमी वा अधिक असणे . 
३)पाण्याची कमतरता असणे 
४)न कुजलेले शेणखत वापरल्यास 
५) अति पाऊस असल्यास किंवा अति प्रमाणात पाणी दिल्यास 


नियंत्रणाचे  उपाय:- 
                              
१) युरिया ठिबक सिंचनातून द्यावा . 
२) निंबोळी पेंड चा वापर करावा 
३) आझोटोबॅक्टर जिवाणूंचा वापर करावा . 
४) हिरवळीच्या  खताचा व सेंद्रिय खताचा वापर करावा   

- संपर्क -


जळगाव : १४, आदित्य प्लाझा , महाबळ रोड , संभाजी चौक ,जळगाव 
फैजपूर   : यावल रोड ,फैजपूर .  फोन -९४२११३४९६३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

केळीसाठी कॅल्शिअम (Ca)

  "शेतकऱ्यानां मदत करू ,                                               देशाच्या विकासाची गती वाढवू ... " केळीसाठी कॅल्शियम या पौष्...