"तंत्रज्ञान आधारित शेतीचा वायदा ,
कमी खर्चात जास्त फायदा ...... "
नत्र हा केळीच्या वाढीसाठी मुख्य प्रवर्तक आहे . लागवडीच्या पहिल्या ६ महिन्यांत जर जास्त निरोगी आणि मोठ्या आकाराची पाने असतील तर घडांचा आकारही मोठा असेल. पानांच्या संख्ये वर तसेच पानाच्या देठाच्या लांबीवर देखील नत्राचा प्रभाव असतो .
नत्राची कमतरता कशी ओळखावी ?
Severe nitrogen deficiency symptom on banana petioles (नायट्रोजन कमतरतेची अती तीव्र लक्षणे) |
- नवीन पाने येण्यास विलंब होतो तसेच दोन पानांमधील अंतर देखील कमी होते .
- पाने फिकट पिवळ्या रंगाची होतात .
- पानाचा देठ Midrib व Petiol फिकट गुलाबी रंगाची दिसतात .
पेटीओल्स जांभळट गुलाबी रंगांची होतात व त्यांच्यातील अंतर देखील कमी होते |
नत्राचा अधिक वापर झाल्यास फळ देण्यास उशीर होऊ शकतो.
बऱ्याच वेळेस नायट्रोजन ची कमतरता आणि गंधक याची कमतरता यांची लक्षणे पानावर सारखी दिसतात . परंतु नायट्रोजन कमतरतेची लक्षणे जुन्या पानावर दिसतात तर गंधकाच्या कमतरतेची लक्षणे नवीन पानावर दिसतात .
नत्राची कमतरता खालील कारणांनी अधिक वाढू शकते .
१) जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असणे .
३)पाण्याची कमतरता असणे
४)न कुजलेले शेणखत वापरल्यास
५) अति पाऊस असल्यास किंवा अति प्रमाणात पाणी दिल्यास
नियंत्रणाचे उपाय:-
१) युरिया ठिबक सिंचनातून द्यावा .
२) निंबोळी पेंड चा वापर करावा
३) आझोटोबॅक्टर जिवाणूंचा वापर करावा .
४) हिरवळीच्या खताचा व सेंद्रिय खताचा वापर करावा
- संपर्क -